अनिल कोलप

श्री. अनिल कोलप
संचालक (संचलन)
महापारेषणच्या संचालक (संचलन) पदी श्री. अनिल विलास कोलप यांची दि. ५ ऑक्टोबर २०२१ पासून नियुक्ती करण्यात आली.
श्री. कोलप हे शिवाजी विद्यापीठाच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगलीचे बी. ई. (इलेक्ट्रिकल) पदवीधर आहेत. त्यांनी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (शिवाजी विद्यापीठ), कोल्हापूर येथून डीसीएम (डिप्लोमा इन काँप्युटर मॅनेजमेंट) पूर्ण केले.
१९९१ मध्ये पदवी घेतल्यावर ते पूर्वीच्या एम.एस.ई.बी.मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले आणि त्यांची १३२ के.व्ही. संगमेश्वर (अउदा संवसु विभाग बाभळेश्वर) नाशिक क्षेत्र येथे नियुक्ती झाली. ऑगस्ट २००३ मधील थेट नेमणुकीअंतर्गत त्यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली आणि डिसेंबर २००९ मध्ये अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली आणि त्यांची नेमणूक ऊर्जा लेखा विभाग, राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली येथे झाली.
२०१८ साली त्यांची पदोन्नती मुख्य अभियंता पदावर झाली व त्यांची नेमणूक राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली येथे झाली. एसएलडीसी येथे त्यांनी स्ट्रीमलायनिंग ऑफ व्हिजिबिलिटी, व्हिडिओ वॉल बदलणे, आरईएमसीचे कार्यान्वयन, आरईडीएसएम रेग्युलेशन कोड अॅण्ड प्रोसिजरची इन हाऊस तयारी, डीएसएम कोर्स व प्रोसिजर, मिटरींग कोड व प्रोसिजर आऊटेज मॅनेजमेंट स्टँन्डर्डायझेशनची महत्त्वाची कामे केली. त्यानंतर त्यांची नेमणूक कराड विभागाचे मुख्य अभियंता म्हणून झाली होती. त्यांच्या पुढील जबाबदारीकरिता खूप-खूप शुभेच्छा!