अशोक आ. फळणीकर

अशोक आ. फळणीकर
संचालक (वित्त)
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या संचालकपदी (वित्त) श्री. अशोक आ. फळणीकर हे २१.०८.२०२० रोजी रूजू झाले. ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, संचालक संवर्गातील अधिकारी आहेत. महापारेषणमध्ये रूजू होण्यापूर्वी श्री. फळणीकर हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई येथे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी यापूर्वी मा. मुंबई उच्च न्यायालय, मा. मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई विद्यापीठ आदी कार्यालयात सेवा केली आहे.
श्री. फळणीकर यांना वित्त व लेखाविषयक कामाचा महत्त्वाच्या पदांवर २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा अनुभव आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठ येथून एम.कॉम. पदवी धारण केलेली आहे. त्यांनी वित्तीय सल्लागार आणि वित्तीय अधिकारी म्हणून विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा महापारेषणला चांगला फायदा होणार आहे. महापारेषणच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.