नासीर कादरी

श्री. नासीर कादरी
संचालक (प्रकल्प)
महापारेषणच्या संचालक (प्रकल्प) पदी श्री. कादरी सय्यद नसीर यांची ५ ऑक्टोबर २०२१ पासून नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९९१ मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळविताना सुवर्ण पदकाचा मान पटकावला, तसेच ते गेट-१९९४ च्या परीक्षेमध्ये भारतात ३८८ व्या क्रमाकांने उत्तीर्ण झाले.
१९९२-९४ दरम्यान त्यांनी औरंगाबादच्या एमआयटी महाविद्यालयात व्याख्यात्याचे काम केले. १९९४ साली त्यांनी तत्कालीन एमएसईबीमधील कनिष्ठ अभियंता पदावर सुरुवात केली.
२००६ साली थेट नियुक्ती अभियानांतर्गत त्यांची निवड होऊन कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती होऊन त्यांनी विविध ठिकाणी महापारेषणच्या विविध जबाबदार्यांचा कार्यभार सांभाळला. औरंगाबाद येथे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) पदावर काम करताना त्यांच्या टीमने वर्ष २००९-१० मध्ये अउदा उपकेंद्रे व वाहिन्या सर्वोच्च संख्येने पूर्ण करण्यात यश मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
जुलै २०१२ मध्ये थेट नियुक्ती अभियानांतर्गत त्यांची पदोन्नती अधीक्षक अभियंता (पारेषण) पदावर झाली आणि ते रचना व अभियांत्रिकी विभाग, सांघिक कार्यालय, मुंबई येथे रुजू झाले. सप्टेंबर २०१९ पर्यंत त्यांनी महापारेषणच्या टीसीसी, टेंडरिंग आणि संवाद विभागांमध्ये अधीक्षक अभियंता पदावर काम केले व त्यानंतर त्यांना मुख्य अभियंता पदावर पदोन्नती मिळाली व त्यांनी अउदा संवसु परिमंडळ, वाशी येथे मुख्य अभियंता पदावर काम सुरू केले.
त्यांना व त्यांच्या टीमला केकतनिंभोरा उपकेंद्र डिजिटल केल्याबद्दल प्रतिष्ठित स्कॉच गोल्ड अवॉर्ड २०१८ मध्ये मिळाला तर एमटीसीआयएल ओपीजीडब्ल्यू कामांकरिता स्कॉच गोल्ड अवॉर्ड २०२० मिळाला. ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथील गोल्डमॅन स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी येथे भेट देणार्या टीममध्ये होते. जेथे महाराष्ट्र : शाश्वत भवितव्याकडे ऊर्जावान होताना हा कार्यक्रम केला.