श्री. संजय ताकसांडे

श्री. संजय ताकसांडे,
संचालक (संचलन)
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या संचालक (संचलन) पदी श्री. संजय ताकसांडे हे दि. १ एप्रिल २०१९ रोजी रूजू झाले. महापारेषणमध्ये रूजू होण्यापूर्वी श्री. ताकसांडे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (महावितरण) पुण्यामध्ये प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी यापूर्वी महावितरणमध्ये अमरावती परिमंडलात मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. त्यानंतर महावितरणच्या सांघिक कार्यालय, मुंबई येथे कार्यकारी संचालक (वितरण) म्हणून काम केले.
श्री. ताकसांडे यांना वीज क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केल्याचा २९ वर्षांचा मोठा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण व पॉवरग्रीड कार्पोरेशनमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना पारेषण आणि वितरण क्षेत्रात असलेल्या अनुभवाचा महापारेषणला चांगला फायदा होणार आहे. महापारेषणच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.