श्री. असीमकुमार गुप्ता

Arvind_Singh1
श्री. असीमकुमार गुप्ता (भाप्रसे),
प्रधान सचिव (संचालक-ऊर्जा) /

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री.असीमकुमार गुप्ता यांची महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ति करण्यात आली आहे. श्री. असीमकुमार गुप्ता हे १९९४ घ्या भारतीय प्रशासन सेवेच्या तुकडीचे अधिकारी असुन त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील महत्वांच्या पदावर काम केलेले आहे.

श्री.असीमकुमार गुप्ता यांनी बी.टेक. (नेव्हल आर्कीटेक्चर), एमटेक,(मेकॅनिकल इंजिनिअरिंग) केलेले आहे. श्री.गुप्ता यांनी कोल्हापूर येथे सहास्यक जिल्हाधिकारी, सांगली, मिरज व कुपवाड, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त तर मुंबई येथील महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयाचे मुख्याधिकारी, ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव आणि कौशल्य विकास व उद्योजक विकास विभागाचे सचिव म्हणूनही त्याने काम पाहिलेले आहे.

This page was last updated on 19 Jan 2021